पुणे : कोणतंही संकट नवीन संधी घेऊन येतं. फक्त ती ओळखता आली पाहिजे. कोरोना महामारीत अनेक उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत. यातच काही नवनिर्मीती सुद्धा होत आहे. याचच एक उदाहरण म्हणजे सोलापुरातील नाष्टेवाला!. नाष्टेवाला म्हटलं की, आपल्याला आठवतो रस्त्यावरील गाडा किंवा एखाद्या कोपऱ्यावरील टपरी, काहींना एखादं हॉटेल! संकटात संधी शोधत सोलापुरातील रस्त्यावरील विक्रेत्याने स्वत:च ॲप तयार केलं आहे. त्यातून तो घरपोच ऑर्डर देत आहे. त्यावर सध्या बुकींगही सुरु झालं आहे.
जगभरात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे खवय्यांना बाहेर पडता येत नाही. बाजार समिती, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनही ही नेहमी रात्री सुद्धा गजबजणारी ठिकाणी. याबरोबर काही उद्योग व्यवसायही रात्री सुरु असतात. त्यातील कामगार व पोलिस, दवाखाने येथील कामगार रात्री चहा किंवा नाष्टा मागवतात. हीच गरज ओळखून सोलापुरात सुनील खंडेराव यांनी नाष्टा देण्याचा व्यवसाय सुरु केला. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर त्यावरही परिणाम झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्यात ॲप सुरु करण्याची कल्पना सुचली. तसा त्यांनी आधीच विचार सुरु केला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये त्या कामाने वेग घेतला.
पाच दहा रुपयापासून ते नाश्ता विक्री करत आहेत. सोलापुरातील नागरिकांनी रात्री कॉल केला की नाष्टा हजर करणारे खंडेराव त्याची ओळख आहे. खंडेराव हे नव ते हव याप्रमाणे व्यवसाय करतात. त्यातूनच त्यांनी ऑनलाईन व्यवहारावर भर दिला होता. पुढे त्यांनी स्वत:चे ॲप सुरु केले. या ॲपमार्फत ते पदार्थांची घरपोच सेवा देणार आहेत. सकाळी नऊ ते रात्री १० वाजेपर्यंत हे ऑनलाईन घरपोच सेवा मिळणार आहे.
सुनील खंडेराव यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आजही तेही चालवत आहेत. पूर्वी सायकलवर फिरत नाष्टा विक्री करत होते, आता गाडीवर फिरत करत आहे. खंडेराव हे वीस वर्षापासून सोलापुरात फिरून पदार्थांची विक्री करीत आहे. त्यातून नागरिकांनी रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत नाष्टा पोहोच करण्याचे काम ते करतात. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आजतागायत सुरु ठेवला आहे. त्यामुळे त्यांची पूर्ण सोलापूरमध्ये ओळख निर्माण झाली आहे.
अशी सुचली कल्पना...
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच सुनील यांना एक नवी कल्पना सुचली की, आपणही प्रत्येकाच्या घरी जाऊन सेवा द्यावी आणि त्यामुळे त्यांनी सर्वांची गरज ओळखून अॅप सुरू केले आहे. त्यावर ती ऑर्डर घेऊन सेवा देण्याचा त्यांचा सध्या मानस आहे. ग्राहकांनी ऑर्डर केल्यापासून पुढील अर्धा तासमध्ये त्यांच्या घरपोच सेवा पोहच केली जाईल, असे यावेळी गवळी बोलताना सांगितले.
ऑनलाइन सेवेत आता हे पदार्थ घरपोच...
ढोकळा, समोसा, कचोरी, शेंगा पोळी, गुलाबजामुन, दहिवडा, कडक भाकरी-दही चटणी, इडली वडा, शेव चिवडा, शाबू खिचडी, मसाला राईस, पुरी भाजी, पोहे, सुशिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.